नृत्यांजली संस्थेतर्फे भारतीय शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी नुकताच ‘ओजस नृत्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला. या महोत्सवात ‘नृत्यार्थी कलाक्षेत्रम्’ च्या नृत्यगुरू राजसी वाघ यांना ‘युवा नृत्य कलाचार्य” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मल्याळम अभिनेत्री श्रीदेवी उन्नी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गौरवचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.या महोत्सवात एकल नृत्य प्रकारात देशभरातून दीडशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. राजसी यांनी भरतनाट्यम् यातील अष्टपदी हा नृत्याविष्कार सादर केला. रसिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात नृत्यार्थी कलाक्षेत्रमच्या विद्यार्थी संपदा भुजबळ हिने पद्मम्; तर अंजली सांगो़ळे हिने शब्दम् हा नृत्याविष्कार सादर केला. या दोन्ही नृत्याविष्कारांना ‘नृत्य ओजस्वी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.भारतीय शास्त्रीय नृत्यकलेला आज जगभरात मोठ्या प्रमाणात वाव असून ही नृत्यकला सादर करणाऱ्या नृत्यगुरू व त्यांच्या विद्यार्थी यांना त्यांच्या कलागुणांना उजाळा देण्यासाठी ‘ओजस’सारखे नृत्य महोत्सव आयोजित करण्यात यावे; अशी अपेक्षा श्रीदेवी उन्नी यांनी यावेळी व्यक्त केली.