बोरघर माणगांव दि,०८ :- माणगांव तालुक्यात सतत धुवांधार पाऊस पडत असून अनेक गावांचा संपर्क तुटला असून माणगांव मध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काळनदी, गोदनदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून या अतिवृष्टीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता जनतेकडून बोलली जात आहे. इंदापूर येथील नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली असून वाढवण, पाणसई, जावटे, भाले या गावांचा नद्यांना पाणी वाढल्यामुळे संपर्क तुटला आहे. शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून पाण्यातून जावे लागत आहे. माणगांव मधील असणाऱ्या शाळेतील विध्यार्थ्यांना होत असलेल्या जास्त अतिवृष्टीमुळे सोडण्यात आले आहे. माणगांव तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मोर्बा रोड या ठिकाणी असणाऱ्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. मोर्बा रोड नदीवरील पुलाच्या ठिकाणचा रस्ता खचण्याची शक्यता असून या रस्तावरील वाहतूक बंद होऊ शकते. माणगांव दिघी रस्त्याच्या कामामुळे मोर्बा रोडच्या रहिवाशांना गटार खोदले नसल्याने त्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे माणगांवकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विश्वास गायकवाड ,बोरघर माणगांव- प्रतिनिधी