बोरघर माणगांव दि, ०८ :- माणगांव येथिल खांदाड गावातील तरुण हे शनिवारी रात्री १० वाजता नदीच्या बाजूला असणाऱ्या शेतामध्ये खेकडी पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळेस या शेतामध्ये मगरीचे लहान पिल्लू चिखलामध्ये रुतले होते. ते पिल्लू चिखलामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु ते चिखलामध्ये रुतल्यामुळे बाहेर पडता येत नव्हते हे खांदाडातील तरुण मयुरेश शिंदे, रोशन घरटकर, साहिल पालकर, संचित सत्वे, अमन कोरपे यांच्या निदर्शनात आल्यावर त्यांनी मगरीच्या पिलाला रस्सी व काठीच्या साहाय्याने बाहेर काढले व त्या पिलाला पाण्याने धुवून परत नदी पात्रात सोडले. या तरुणांनी या पिलाला एक प्रकारचे जीवदानच दिले. कालनदीमध्ये मगरीच्या संख्यमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे खांदाड राहिवाश्यांकडून बोलले जात असून नागरिकांनी सतर्क राहावे.
विश्वास गायकवाड प्रतिनिधी :- बोरघर माणगांव