लातूर दि,१७ : -उन्हाळयाची सुट्टी संपल्यानंतर जिल्हाभरात आज (दि.१७) जून रोजी शाळा सुरु झाल्या आहेत. यामुळे सर्वत्र प्रवेशाची धामधुम सुरु होती. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेचा पहिला दिवस कायम लक्षात रहावा व शाळेची भिती निघुन जावी यासाठी चिंचोली (तपसे) येथील जि.प. शाळेत शाळा प्रवेशाचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी काढण्यात आली, तसेच विद्यार्थ्याला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी कवठाळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन व्यंकट बिराजदार, संगमेश्वर कुंभार (सदस्य शा.व्य.स.) यांची उपस्थिती होती.
दरम्यान विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यांत आले. तसेच शाळेत नव्याने रुजू झालेले धर्मराज भिसे (प्रा.प.), अनुराधा कनामे (स.शि.) यांचे स्वागत करण्यांत आले. यावेळी शाळेचे मख्याध्यापक मोहनराव मोरे यांनी विद्यार्थांना लाडू खाऊ घातले.
यावेळी शाळेतील शिक्षक सिद्धेश्वर आयरेकर, अशोक पवार, संतोषीमाता लोहार, देवानंद कोंडमगिरे, प्रदीप इज्जपवार, चव्हाण, व सेविका स्वाती बिराजदार यांच्यासह पालक, गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.