पुणे दि,२२ : – लोकसभा २०१९ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरून पुणे पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय व राज्य राखीव दलाचे कर्मचारी यांनी पथसंचलन केले. रविवारी आणि सोमवारी शहरातील प्रमुख रस्ते, संवेदनशील ठिकाणी हे पथसंचलन घेण्यात आले.
सोमवारी पुणे पोलिसांनी लष्कर ते अल्का टॉकीजपर्यंत पथसंचलन करण्यात आले. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग आणि परिमंडल १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान आणि पुणे पोलिसांनी पथसंचलन केले. यात केंद्रीय निमलष्करी दलाच्या ५ कंपन्या, ५० अधिकारी, १५० जवान आणि २ क्यूआरटी पथकांनी सहभाग घेतला होता.
तर रविवारी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन केले. त्यात १७० अधिकारी कर्मचारी सहभागी होते. तर दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या पथसंचलनात १८६ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.