मुंबई दि,१५ :- राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी दुसरी यादी जाहीर मावळ मधून पार्थ पवार, शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत याबाबतची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (शुक्रवारी) दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अमोल कोल्हे – शिरूर, समीर भुजबळ- नाशिक, बजरंग सोनवणे- बीड, आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अत्यंत बहुचर्चित ठरलेल्या पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरुरमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आलेल्या डॉ. अमोल कोल्हे नाशिकमधून समीर भूजबळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.