पुणे,दि.०६:-पुणे शहरातील अटल गुन्हेगारांनी जर आपली घरे जर बेकायदा पद्धतीने बांधली असतील, तर त्यावर आता बुलडोझर फिरवल्या जाणार आहे. पुणे शहर पोलिसांनी याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यातील वनराज आंदेकर यांच्या खुनामुळे पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टोळ्यातील धुमाकूळ पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वनराज यांच्या खुनात सहभागी असलेल्या प्रमुख आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी या गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या बेकायदा घरावर बुलडोझर फिरविण्याची तयारी केली आहे.