पुणे,दि.०५:- पर्यावरणाच्या संरक्षणासोबतच शाश्वत पद्धतीने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध आहे. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आहे. तसेच नागरिकांनी ,
पुणे महानगरपालि पर्यावरण पूरक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकाना आवाहन करण्यात आले आहे.व आपल्या घरी गणपती बसविताना नैसर्गिक साहित्य , जैवविघटनशील व पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरून मूर्तीची सजावट करण्यात यावी व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.
पुणे महानगरपालिका पर्यावरण विभाग व लिबर्टी अर्थवेअर आर्ट यांच्या मदतीने फक्त शाडू मातीची मूर्ती “ मूर्ती आमची , किमंत तुमची” हा उपक्रम हाती घेतला आहे. शाडू माती चा वापर करून भक्ती संगम प्रकारच्या माती च्या मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहे. या मूर्ती चे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या दोन तासात पाण्यात विरघळतात व विसर्जन केल्यानंतर चे पाणी घरगुती कुंडी मध्ये वापरता येते.
“ मूर्ती आमची , किमंत तुमची “ उपक्रम घोले रोड आर्ट गॅलरी, घोले रोड , शिवाजीनगर , पुणे येथे दिनांक ५, ६ व ७ सप्टेंबर २०२४ दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत असून नागरिकांसाठी पर्यावरण पूरक मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे