पुणे,दि.१९:- सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यानाच्या गेटवर गेली अनेक महिने अनधिकृत पथारी व्यवसाय चालू केला होता
याबद्दल मोठ्या प्रमाणात पोलिसांकडे व महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. व मंगळवारी (ता. १८) रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. स्थानिक पथारी धारकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला असतानाही पोलिसांनी विरोध डावलून कारवाई पूर्ण करण्यास पूर्ण मदत केली.
या कारवाईसाठी महापालिका सहाय्यक आयुक्त संदिप खलाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, विभागीय अतिक्रमण निरीक्षक नारायण साबळे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरूले, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे, श्री कृष्ण सोनार, भिमाजी शिंदे, सुभाष जगताप, गणेश तारू, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्रीमती मेघा राऊत, सागर विभुते, प्रथमेश पाटील, विठ्ठल ओमासे, मंथन आमले, श्रीमती किरण डवरी, अभिलेष कांबळे, पंकज आव्हाड, अमोल भालेराव श्रीमती ऐश्वर्या रेखाते, नितिन खैरनार, राकेश सोनावणे या सर्व अधिकाऱ्यांनी जेसिबी एक, ट्रक पाच, बिगारी सेवक एकतीस, आठ जवान महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस अधिकारी पाच, महिला पोलीस दोन, हातगाडी आठ, लाकुडमाल दोन, ट्रक टेबल एक यांच्या सहाय्याने कारवाई केली.
पु ल देशपांडे उद्यानालगतच सदर पथ विक्रेत्यांना दिलेल्या नियोजित जागी ते व्यवसाय करीत नसल्याने व गेटच्या पुढे वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय करीत असल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांनी अशाच प्रकारे अनधिकृत पुन्हा गाड्या लावल्यास त्यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाईल व अधिकृत लायसन धारक असलेल्या विक्रेत्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे.
– माधव जगताप, उपायुक्त अतिक्रमण विभाग