पुणे,दि.१६ :- पुणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत स्टॉल, पथारी, हातगाडी विक्रेत्यांवर कारवाईत शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत नवयुग मित्र मंडळ, आय.सी.आय.सी.आय. बँक भांडारकर रोड परिसरात खाद्यपदार्थ विक्रेते, गॅस सिलेंडर वापरणारे व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण ६० विक्रेत्यांवर यावेळी कारवाई केली.
कारवाईत स्टॉल, ०९ हातगाडी, ०७ पथारी, ०० सिलेंडर ०७ शेड ३० आणि इतर अशा एकूण ६० जणांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग उपायुक्त माधव जगताप यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.पालिकेने दिलेले परवाने, फेरीवाला प्रमाणपत्र अटी, शर्तीचा भंग करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर / मान्य व्यवसाय न करणे, गॅस सिलेंडरचा वापर अशा विक्रेत्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. अनधिकृत व्यवसाय करणा-या व्यवसायिकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
सदर कारवाई उप आयुक्त अतिक्रमण विभाग माधव जगताप,व कारवाईत विभागीय अतिक्रमण निरीक्षक नारायण सावळे, क्षेत्रिय अतिक्रमण निनंक्षक. संजय कुंभार अतिक्रमण निरीक्षक. शशिकांत टाक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक. ज्ञानेश्वर खोलमकर, बंभव जगताप, सुशिल कहाणे, राहुल डोके व परिमंडळ क्रमांक ०१ ते ०५ कडील संपूर्ण अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, पोलीस निरीक्षक ०१ व पोलीस कर्मचारी ०९ महाराष्ट्र सुरक्षा दल पथक, कायम बिगारी भयम, ठेकेदार बिगारी संवक, स्थानिक वाहतूक विभागाकडील कर्मचारी तसेच बांधकाम विकास विभाग यांच्या सहाय्याने संयात कारवाई करिता जे.सी.बी., गॅस कटर, ब्रेकर, विद्युत विभागाकडील स्टाफ अशा सर्व यंत्रणेसह विशेष कारवाई मोहीम राविण्यात आली.