पुणे दि. ५ : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत संत ज्ञानेश्वर चौकाजवळील एफ सी महाविद्यालय ते मंजाळकर चौक ८०० मीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूस पार्किंग व्यवस्थेत बदल करून पी १, पी २ करण्यात आल्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १३ जूनपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.