पुणे दि.२५:- पुण्यातील सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील देवाच्या मूर्ती आणि मखर चोरीस जाणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फत सखोल तपास करण्यात यावा. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबतचे सविस्तर लेखी निवेदन त्यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पाठविले आहे.
दिनांक आठ मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करून येथील देवाच्या मूर्ती आणि मखर यांची चोरी केल्याची घटना घडल्याचे विविध माध्यमांतून समोर आले आहे या प्रकरणाची डॉ. गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेत त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.