पुणे,दि.१९ ;- पुणे सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) हद्दीत पुणे शहर खंडणी विरोधी पथकाच्या अंगावर गाडी घालून पळून जाणाऱ्या दोन जणांना अटक केली. पुणे शहर खंडणी विरोधी पथकाने संबधीत आरोपींच्या गाडीच्या चाकावर गोळीबार केल्यानंतर ती गाडी थांबली गेल्याची माहिती समोर येत आहे.
दोन जण हे कथित पत्रकार असून त्यांनी पुणे येथे खंडणी मागितल्याने काही दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते .पाटस टोल नाक्याच्या काही अंतरावर गुरुवारी दुपारी चार वाजता हा थरार घडला आहे. संबधीत आरोपींनी पुणे येथे खडणी मगितल्याची तक्रार होती. त्यानुसार पुणे खंडणी विरोधी पथक त्यांच्या मागावर होते. आज दुपारी दोघांचे पुणे सोलापूर महामार्गावरील वरवंड येथे लोकेशन मिळत होते.
त्यानुसार पथकाने पाठलाग केला. पथकाने पाटस टोल नाक्याच्या काही अंतरावर सापळा लावला.आसता आरोपी चार चाकीने सोलापूर दिशेला जात असताना खंडणी विरोधी पथकाने त्यांना अडविले. मात्र त्यांनी पथकाच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचे धाडस केले. त्यावेळी पथकातील पोलिसांनी त्यांच्या गाडीच्या चाकावर गोळीबार केला.यावेळी टायर फुटल्याने गाडी थांबताच पथकाने शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.संबधित आरोपी हे पत्रकार असल्याचे समोर येत आहे.शिवाय त्यांच्या गाडीच्या काचेवर तसे नाव लिहिले आहे. संबंधित आरोपींनी पूणे येथे फिर्यादी संतोष थोरात रा खराडी आसे एका व्यावसायीकाकडे पाच कोटींची खंडणी मगितल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे फिर्यादी हे एका सॉफ्टवेअर कंपनी मालक असून त्याची बंदनामी करण्याची भीती घालुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपी नामे महेश सौदागर हनमे रा राजेश्वरी नगर उत्तर सोलापुर जि सोलापुर यांने ३ लाख ८० हजार रुपये स्विकारुन आणखी ५ कोटी रुपयांची मागमी करत असल्यामुळे फिर्यादी यांनी सदर बाबत पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर यांचेकडे तक्रारी अर्ज दिला होता. सदरचा अर्ज पुढील कारवाईकामी खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे यांचेकडे दिला होता. सदर प्रकरणाची गांभीर्य पाहुन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सदर तक्रारीची तात्काळ दखल घेवून फिर्यादी यांचे अर्जाची सखोल चौकशी करुन अर्ज चौकशीअंती दखलपात्र गुन्हा घडल्याचे निषन्न झाल्याने वरिष्ठांचे आदेशानुसार आरोपी महेश हनमे यांचेविरुध्द दि १८/०५/२०२३ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान काळामध्ये आरोपी नामे महेश हनमे रा. सोलापूर दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे संतोष पोपट थोरात यांना वारवार फोन करून पैशाची मागणी करत होता. व तात्काळ ५० लाख रुपये घेवुन पाटस परिसरात बोलवित असल्याने अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी खंडणी विरोधी पथकांची तीन वेगवेगळी पथके तयार करून आरोपी शोध घेणेकामी रवाना केले.होते दरम्यान आरोपींनी फिर्यादीस वारंवार लोकेशन बदलुन फोन करुन पाटस परिसरात पैसे घेवुन येण्यास सांगितले त्यामुळे तीनही टीम या पाटस परिसरात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण यांच्या टीमला पुणे सोलापूर हायवे लगत पाटस टोलनाक्याच्या पुढे लकी हॉटेलचे जवळ रस्त्याचे कडेला पांढरे रंगाच्या फोर्ड फियस्टा गाडी नंबर एम एच १४ बी के. ४४८४ या गाडीजवळ पाहिजे आरोपी महेश हानमे व एक इसम दिसला असता पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण व पो. हवा सुरेंद्र जगदाळे यांनी त्या ठिकाणी जावुन स्वतः ओळख कायदेशीर अटकेची कारवाई करत असताना त्यावेळी आरोपी नामे १) महेश सौदागर हनमे वय ४७ वर्षे धंदा- पत्रकार, रा. राजेश्वरी नगर, ब्लॉक नं. ११२, बाळे उत्तर सोलापूर जि. सोलापूर २) दिनेश सौदागर हनमे वय ४४ वर्षे धंदा- पत्रकार रा. राजेश्वरी नगर ब्लॉक नं. १५२, बाळे, उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दगड फेकून मारहाण करुन शिवीगाळ धक्कबुक्की करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फियस्टा गाडी ही अंगावर घालून अटकेस प्रतिबंध केला त्यावेळेस स्वताचा बचाव करण्यासाठी उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी स्वताचे सरकारी पिस्टल मधुन गाडीच्या मागील टायरचे दिशेने दोन राऊंड फायर केले त्यामुळे गाडीचे टायर फुटले त्याचदरम्यान पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव व टीम त्याठिकाणी येवुन तेथे उपस्थिती असणा-या स्थानिक लोकांचे मदतीने त्या दोघांना पकडले. नमुद आरोपी विरुध्द पोलीस हवालदार २४७१ सुरेंद्र जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद दोन्ही आरोपी हे चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. पोलीस कस्टडीत असुन नमुद आरोपीनी अशाच प्रकारे अनेक लोकांकडुन खंडणी उकळल्याची शक्यता असुन त्या दृष्टीने अधिक तपास सुरु आहे.सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक — २. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहा. पो. निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, सदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, अनिल मेंगडे, इश्वर आधळे राहुल उत्तरकर, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे आशा कोळेकर यांनी केलेली आहे.