पुणे,दि.१० :- पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील पुण्यात काही दिवसांपूर्वी अवैद्य धंद्यांचा सुसोळा पाहण्यास मिळत होता व पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा, काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारलाचे चित्र पाहण्यास मिळल आहे व दि.०८ रोजी झालेल्या कारवाई चंदननगर, येथील डेला थाई स्पा,सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांनी पर्दाफाश करत १ पिडित महिलेची सुटका केली, तर स्पा मसाज सेंटर चालविणाऱ्या मालकासह २ जणांना अटक केली. ही कारवाई सोमवार (दि.०८) करण्यात आली. व स्पा मालक व २ जणांवर गुन्हा दाखल केली आहे. याबाबत विरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं १९४ / २०२३ भादवि ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. चंदनगर येथे एका इमारतीत डेला थाई स्पा, नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा,पोलिसांना मिळाली.पोलिसांनी मिळालेल्या व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि- हाईक पाठवून खात्री केली असता, मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ स्पा सेंटरवर छापा टाकला.व याबाबत पोलीस कर्मचारी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीन पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तेंच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजिविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणाहुन मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण वीस हजार रू मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व स्पा चालक व पोलीसांना पाहिजे असलेल्या आरोपी स्पा चालक असे एकुण ०२ इसमांविरूध्द पुढील कारवाई करीता चंदननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्रीरामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.