पुणे,दि.२५ :- पुणे शहरातील क्रांती चौक, बुधवार पेठ परीसरात बेकायदेशीरपणे एका दुकानात काही इसम सोरट, व लॉटरी च्या, नावाखाली जुगार खेळत व खेळवत असलेल्या जुगार अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी १८ जणांनान ताब्यात घेऊन ६७ हजार २८० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवार (दि.१७) रोजी सायंकाळी ७ वाजता केली आहे. फरासखाना पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचा पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ६७ हजार २८० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १८ जण जुगार खेळताना मिळुन आलेले विरूध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं. ६१ / २०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने केली आहे.