पुणे,दि.१७:- पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाने वानवडी परिसरात शनिवार दि.१५ रोजी. क्लीओज स्पा अॅण्ड सलुन,फातीमानगर, वानवडी, येथे स्पावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी ५ तरूणींची सुटका केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, क्लीओज स्पा अॅण्ड सलुन,फातीमानगर, वानवडी, येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने क्लीओज स्पा अॅण्ड सलुन वर छापा टाकला. स्पा मालक विरूध्द कारवाई करण्यात आली. तेथून ५ तरूणींची सुटका करण्यात आली आहे.सदरची कारवाई सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भरत जाधव तसेच सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, सहा.पोलीस निरीक्षक,अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी स्पा चालक यांना ताब्यात घेवुन, त्यांचेविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं. १८५/२०२३ भादवि ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन स्पा चालक आरोपी व ०५ पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.