नांदेड,दि.१५:- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबेश्वर जिल्हा नाशिक अंतर्गत गुरुपीठाचे पिठाधिश प.पूज्य गुरूमाऊली च्या आदेशाने
चैत्र कृ 5 दिनांक 11 एप्रिल 2023 ते चैत्र कृ 13 दिनांक 18 एप्रिल 2023 पर्यन्त प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रात
सकाळी 8: 00 ते रात्री 8:00 पर्यन्त महीला सेवेकरी प्रहर सेवा करतात व पुरुष वर्ग रात्री 8: 00 ते सकाळी 8:00 प्रहर सेवा करत असतात.
दररोज सकाळी 6:00 ते 7:00 यजमान जोडप्यासह स्तोत्र मंत्र पठण सह नित्यास्वाहकार सकाळी 8: 00
वाजता भूपाळी आरती
8:30 ते 10:30 सामूहिक गुरुचरीत्र पठण
10: 30 वाजता नैवद्य आरती
11: 00 ते 12:00 दैनंदिन याग (यज्ञ) 12: 00 ते 1:00 (मध्यांतर)
1:00 ते 5:00 सामूहिक स्वामी चरित्र, दुर्गाशाप्तशती, मल्हार सप्तशती, रूद्र पठण, श्री स्वामी समर्थ सामूहिक जप 5:30 ते 6:30
पालखी सह औदुंबर प्रदक्षिणा
6:30 ते 7:00 वाजेपर्यंत नैवद्य आरती
7:00 सामूहिक विष्णू सहस्त्र नाम पठण
धर्माबाद पुण्य नगरीतील भाविक सज्जन सेवेकरी यांनी या उच्च कोटी सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान केंद्राच्या वतीन करण्यात आले. सप्ताह विषयी सविस्तर माहिती धर्माबाद केंद्रातील उपस्थीत सेवेकर्यानी उपरोक्त प्रतिनिधि शी बोलताना माहिती दिली.
नांदेड,धर्माबाद, प्रतिनिधी :- सिध्देश्वर मठपती