पुणे,दि.१५:- पुण्यात शिवाजी नगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरुन पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून एका गुंडाने शिवाजीनगर येथील जुन्या राजीव गांधी वसाहतीत दहशत पसविण्याचा प्रयत्न केला.पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून फियादी वर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
याबाबत काका रामचंद्र शिरोळे (वय कसबा ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार कैलास काकडे (वय १९, रा. शिंदे वस्ती एसआरए बिल्डिंग) याला अटक केली आहे. हा प्रकार जुन्या राजीव गांधी वसाहतीजवळ १३ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची भंगाराची हातगाडी जुन्या राजीव गांधी वसाहतीजवळ
उभी केली होती. फिर्यादीच्या मुलाने आरोपीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती.या कारणावरुन फिर्यादीने धारदार लोखंडी हत्याराने वार करुन जीवघेणा हल्ला केला.
सार्वजनिक ठिकाणी शस्त्र हवेत फिरवून दहशत निर्माण केली व फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास
पोलीस उप निरीक्षक म्हस्के करीत आहेत.