पुणे,दि.०७:- पुण्यातील बाणेर रोड सोमेश्वर चौक येथे 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त सोमेश्वर दक्षिणमुखी शनि मारुती मंदिर ट्रस्ट च्या वतीने श्री मारुती जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सोमेश्वर दक्षिणमुखी शनि मारुती मंदिर सभा मंडपात सकाळी ६ ते १० या वेळेत होमहवन व इतर विधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून
पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.याबाबत माहितीसोमेश्वर दक्षिणमुखी शनि मारुती मंदिर ट्रस्ट.विश्वस्त.चे सचिव. बाळासाहेब बानगुडे, यांनी दिली.तसेच विश्वस्त दत्तात्रेय करपे, अशोक सकट, हेमंत डांगे, व इतर मान्यवर उपस्थित होते ्पुणे शहरातील बाणेर रोड सोमेश्वर चौक येथे गुरुवारी हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण व चैतन्यमय वातावरण साजरा झाला. हनुमान नामाच्या जयघोषाने परिसर निनादला होता. दिवसभर भंडारा अशा कार्यक्रम सोमेश्वर दक्षिणमुखी शनि मारुती मंदिर ट्रस्ट च्यावतीने १० हजार पेक्षाही जास्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.धार्मिक कार्यक्रम हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरांमध्ये पहाटे ५ वाजता अभिषेक, सकाळी ६ वाजता हनुमान
जन्मोत्सव, संगीतमय सुंदरकांड पठण, भंडारा व महाप्रसाद वाटप, महाआरती, असे कार्यक्रम पार पडले. धार्मिक कार्यक्रमांमुळे चैतन्याचे वातावरण होते.मंदिरे सजलीप्रत्येक मंदिरावर आकर्षण विद्युत रोशणाई करण्यात आलेली होती. मंदिर परिसरात मनोवेधक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. भजन, गीतांचे मंगलमय ध्वनी वातावरणात प्रसन्नता वाढवत होते.व भंडाऱ्याच कार्यक्रम आयोज करण्यात आले होते