पुणे,दि.०५:- पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील तक्रार यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेणार्या ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.डॉक्टरला अॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. पवन भिला शिरसाठ वय 43, भौतिकोपचार तज्ञ, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालय, पुणे) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यामधील तक्रारदार हे शासकीय सेवेत आहेत. त्यांनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळण्यासाठी ससून हॉस्पीटलमध्ये अर्ज केला होता. ते सर्टिफिकेट देण्यासाठी डॉ. पवन शिरसाठ यांनी दि. 3 आणि दि. 6 एप्रिल 2023 रोजी तक्रारदाराकडे सुरूवातीला 60 हजार रूपयांची आणि नंतर 50 हजार रूपयांची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी डॉ. पवन शिरसाठ यांनी 60 हजार रूपयांची लाच मागुन ती सरकारी पंचासमक्ष घेतली. अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना लाच घेतल्यानंतर ताब्यात घेतले. ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला 60 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक सांगोलकर अधिक तपास करीत आहेत.
शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
२. अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३
४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००
५. ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in –
६. वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in
७. ऑनलाईन अॅप तक्रार – www.acbmaharashtra.net.in