पुणे,दि.१५:- वाहन व गृह कर्ज साठी काही बँका लोन कॉन्सिलरही नेमलेल्या असतात. अशाच एका लोन कॉन्सिलरने बनावट अॅटोलोन प्रकरणे करुन स्टेट बँक ऑफ इंडियाला ४६ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकारी ममता कुमारी यांनी पुणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदित्य नंदकुमार सेठीया (रा. प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया युनिर्व्हसिटी रोड शाखा व टिळक रोड शाखेत २०१७ ते २०१९ दरम्यान प्रकार घडला.
याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे
सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर अधिक तपास करीत आहेत.