पुणे,दि.०७ :- पुणे शहर कोंढवा पोलिसांनी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी एन.आय.बी.एम. रोडवरील एका शॉप येथे छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख 73 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरामध्ये अवैधरित्या गुटख्याची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची वाहतूक व विक्री करण्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तपास पथकाला दिले होते. तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक जोतिबा पवार व विशाल मेमाने यांना माहिती मिळाली की, लोणकर नगर, एन.आय.बी.एम रोड, कोंढवा खुर्द येथील एका पान शॉपमध्ये तंबाखुजन्य गुटखा विक्री केली जात आहे. पोलिसांनी एका पान शॉप येथे छापा मारुन गुटखा विक्री करताना आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे केलेल्या चौकशीत सदर गुटखा एका व्यापाऱ्याकडून कोंढवा बु.) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती मिळाली. व त्या व्यापाऱ्याचा कोंढवा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील,
पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, विशाल मेमाने, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले,
सुरज शुक्ला, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.