पुणे ग्रामीण,दि.०६:- राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला पुण जिल्हात येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून 10 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा व 15 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 25 लाख 67 हजार 40 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांना गुप्त बातमी मिळाली की,वाहन क्रंमाक ट्रक नं. KA 32 AA 1138 लोडींग वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा अवैधरीत्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी घेऊन जात आहे
व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये. कुसगांव ता. मावळ, जि.पुणे गांवचे हद्दीमध्ये पुणे ते मुंबई एक्स्प्रेस हायवे पुणे ते मुंबई बाजुकडे जाणारे लेनवर आय. आर. बी. कार्यालयाचे समोरील बाजूस असणारे हायवेवर चोरटी विक्री / वितरण करण्यासाठी घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक च्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, व स्टॉफ व पंच असे कुसगांव येथे सापळा रचला होता. सदरचे वाहन हे कुसगांव कडुन मुंबई कडे जातांना थांबविले. सदर वाहनामध्ये चालक असल्याचे दिसून आले. चालक व इतर साथीदार ताब्यात घेतले व वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रक नं. KA 32 AA 1138 लोडींग वाहनामध्ये 10 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला मिळून आला. सपोनि यांनी पंचासमक्ष 10 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा व 15 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण 25 लाख 67 हजार 40 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांनवर मुद्देमालासह कारवाई करण्यात आलेले आहे.
यामध्ये अन्न व औषण प्रशासन, महाराजा गायकवाड, पुणे यांना दिलेल्या पत्राचे आधारे त्यांनी १) मोहम्मद खलील जमाल अहंमद शेख, (ट्रक चालक), वय ४० वर्षे, बहामपूर, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक, २) नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे, (ट्रक क्लिनर), वय ३५ वर्षे, रा.जि. बिदर, राज्य कर्नाटक, ३) सदाम उर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर (ट्रक मालक), रा. मुल्ला गल्ली, गुलबर्गा, कर्नाटक यांचेविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५० / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा सन २००६ चे क. ३० (२) ( a ), २६ (२) (i), २६ (२) (iv) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला आहे.सदरची कामगिरी ही अंकीत गोयल, पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, सत्यसाई कार्तीक, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्था. गु. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक.महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पो. हवा. अंकुश नायकुडे, पो. हवा. स्वप्नील अहिवळे, पो.हवा चंद्रकांत जाधव, पो.हवा. मंगेश थिगळे, पो.ना.अमोल शेडगे, पो.कॉ सुभाष शिंदे, चा. पो.कॉ अंकुश पवार, चा.पो.कॉ. अक्षय सुपे यांनी केली आहे.