पुणे,दि.०३:- पुणे शहरातील जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृहामध्ये सात अल्पवयीन मुलांनी भर दिवसा संस्थेच्या सरंक्षण भितीला शिडी लावून त्यावरुन पसार झाले होते.
याप्रकरणी काळजीवाहक संतोष किसन कुंभार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार सोमवारी दि ३० रोजी सकाळी पावणे बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला
पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील बाल निरीक्षणगृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांत पकडलेल्या विधी संघर्षीत मुलांना ठेवले जाते. बाल न्यायालय मंडळाच्या आदेशानुसार सौरभ वायदंडे यालाही निरीक्षणगृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. या मुलांना वेगवेगळ्या सत्रांकरीता बाहेर काढले जाते. त्यावेळी या १६ -१७ वर्षाच्या ७ मुलांनी तेथील शिडी घेऊन ती भिंतीला लावली. त्यावरुन चढून जाऊन ते पळून गेलेली होती व
येरवडा (बाल सुधारगृह) येथुन पळुन गेलेल्या विधीसंघर्षित बालकांचा शोध घेवुन त्यांना परत बालसुधारगृहात जमा करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांचे आदेश दिला होते..
त्याप्रमाणे युनिट-२ चे प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांनी त्यांचे पथकातील सहा.पो.नि… वैशाली भोसले व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे दिं ०२ रोजी पोलीस अंमलदार, नामदेव रेणुसे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी मिळाली कि सिहगड रोड नादेड फाटा येथुन ०२ विधीसंघर्षित बालक लपून बसले आहेत व तिथे जाऊन बालकांना ताब्यात घेतले असुन, त्यांची ससुन हॉस्पीटल येथे वैदयकिय तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकामी येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्र.८८/२०२३ भा. द. वि. क. ३६३ मध्ये ताब्यात देण्यात आलेले आहे. अधिक तपास येरवडा पोलीस स्टेशन येथे चालु आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार, नामदेव रेणुसे, उत्तम तारु, प्रमोद कोकणे, गणेश थोरात व नागनाथ राख या पथकाने केली आहे.