पुणे,दि.०३:- मोक्कातील आरोपीला घरझडतीसाठी घेऊन जात असताना आरोपी पळून गेला.
प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचार्याला सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबित केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंढे आणि पोलीस नाईक महेश राजेंद्र जाधव अशी त्यांची नावे आहेत. मार्केट यार्ड येथील आंगडियाच्या कार्यालयात घुसून अविनाश गुप्ता याच्या टोळीने गोळीबार करीत तब्बल २८ लाख रुपये लुटून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुप्ता याच्या टोळीला अटक केली.होती व पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गेल्या महिन्यात मोक्का कारवाई केली होती.
त्याचा तपास वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला होता.
असे असताना रामदास मुंढे व महेश जाधव यांनी यातील ९ आरोपींपैकी संतोष पवार व साई कुंभार यांना पोलीस कोठडीतून बाहेर काढले.
व घर झडतीसाठी खानापूर येथे घेऊन गेले असता पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता दोघांना खानापूरला घेऊन गेले.
त्यातून संतोष पवार हा पळून गेला.
आरोपी पळून जाण्यास पोलिसी कर्तव्यात बेजबाबदार व बेफिकीर गैरवर्तन कारणीभूत ठरल्याने
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दोघांना निलंबित केले आहे.