पुणे,दि.३०:- पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून पुण्यात बाणेर-पाषण लिंक रोड परिसरातील फर्निचरचे शोरूम व हॉटेल्स यांच्यावर मिळकतकर थकबाकी वसूलीची कारवाई करण्यात आली.
मंगळवारी दि २९ रोजी एकूण २४ थकबाकीदारांवर कारवाई करत एकाच वेळी २४ मिळकती सील करण्यात आल्या. तर, १५ मिळकतधारकांकडून १ कोटी २४ लाखांचा कर महापलिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला. ही सर्व दुकाने व हॉटेल अनधिकृत उभारण्यात आलेली असल्याने महापालिकेने त्यांना तीनपट दंड आकारला आहे.
या मिळकतधारकांना सुमारे ४ कोटी ९० लाखांची बिले पुणे महापालिकेकडून देण्यात आली होती. तसेच, थकबाकी भरण्यासाठी नोटीसाही बजाविण्यात येत होत्या. मात्र, पालिकेच्या नोटीसांना केराची टोपली दाखवित असल्याने कर संकलन विभागाने थेट कारवाईचा बडगा उभारत कर वसूल केला. प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे, सुनील मते, वसंत सुतार, राजेश कामठे यांच्या नियंत्रणाखाली विभागीय निरीक्षक दीपक आवटे, कमलेश प्रधान, नितीन बोऱ्हाडे, हनुमंत अडगळे, गणेश मांजरे, प्रशांत घाडगे, सागर शिंदे, राजेंद्र पेंडसे, गणेश लाड, विकास खिलारे, भानुदास यादव, आशिष बतीसे, मंगेश चांदेरे, रोहन मकवाना, अवधूत देशपांडे, नवनाथ पाडळे, अतुल दगडे, सतीष दगडे, अजय वाघमारे, किरण दगडे, मंगेश चांदेर, संग्राम देवकर, मीरा पाटील, विकास चांदेरे व औंध बाणेर बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पेठ निरीक्षक यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.