पुणे,दि.३०:-तक्रारदार यांचे भावाचे मोबाईल खरेदी विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे. त्यांनी चोरीचे मोबाईल खरेदी केले म्हणून मोबाईल चोरीच्या गुन्हयात आरोपी न मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस कर्मचार्यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
पोलीस शिपाई दीपक प्रल्हाद क्षीरसागर (वय ३४) गुन्हे शाखा युनिट ३ आणि सिमोन अविनाश साळवी (वय २७) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले होते. त्यात त्याला आरोपी न करणे व अटक न करणे यासाठी पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर याने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. क्षीरसागर याने २ लाख रुपयांपैकी ३० हजार रुपये साळवी याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला. तक्रारदाराकडून सिमोन साळवी याने ३० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यानंतर क्षीरसागरलाही ताब्यात घेण्यात आले.
गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करत आहेत.सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर
३. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
४. अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
५. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३
६. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००
७. ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in
८. वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
७. ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in
सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.