पिंपरी चिंचवड,दि.२२ :-पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड अंतर्गत दि.२० ते २१ ऑगस्ट २०२२ दरम्यान पोदार ‘थंडर १०’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर १४ व १७ वर्षे वयोगट मुले व मुली यांच्या दरम्यान ही स्पर्धा, पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड क्रीडांगणावर टर्फ फुटबॉल मैदानावर प्रथमच घेण्यात आली. यात १४ वर्षे वयोगटात मुलांचे बारा संघ, तर १७ वर्ष वयोगटात मुलींच्या सात संघांनी सहभाग घेतला.
कोरोनाच्या महामारी नंतर दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड आयोजित पोदार ‘थंडर १०’ फुटबॉल अंतर शालेय क्रीडा स्पर्धा सुरु झाली. दोन वर्षानंतर झालेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. १४ वर्षे वयोगट मुलींच्या गटामध्ये चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाने पोदार वाकड स्कूलचा अंतिम सामन्यात १-० ने पराभव करीत विजय प्राप्त केला व तसेच १४ वर्ष मुलांच्या गटा मध्ये पोदार चिंचवड ने पोदार पिपरीचा अंतिम सामन्यात ४ – ० ने पराभव केला.
तसेच १७ वर्ष मुलांच्या गटात, अटीतटीच्या सामन्यात penalty मध्ये पोदार चिंचवड ने पोदार वाघोलीचा अंतिम सामन्यात १-० ने पराभव केला.
तचेच १७ वर्ष मुलीच्या गटात पोदार चिंचवड ने पोदार पिंपरी चा अंतिम सामन्यात २-० ने पराभव केला.
स्पर्धेच्या उद्घाटन करीता राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू श्री जुबेर देसाई व पोदार पुणे हब चे महाव्यवस्थाक श्री फ्रँकलिन सर, पोदार चिंचवड च्या प्राचार्या सौ शहनाज कोटार मॅडम व तसेच पुणे हब विभाग स्कूल चे सर्व प्राचार्य व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या वेळी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे श्री जुबेर देसाई म्हणाले की फुटबॉल प्रचार ,प्रसार आणि प्रशिक्षण झाल्यास गुणी मुला मुलींना त्यांचे क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल व तसेच पोदार हब चे महाव्यवस्थापक श्री फ्रँकलिन सर म्हणाले की कोणत्याही क्षेत्रात दीर्घकाळ ठसा उमटवण्यासाठी मैदानी खेळाला पर्याय नाही या वेळी सर्व पुणे हब स्कूल चे प्राचार्य व उपस्थित क्रीडा शिक्षकाचे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेकरिता पोदार हब पुणे चे सर्व शाळांचे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच फुटबॉल चे सर्व पंच खेळाडूनीं परिश्रम व मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना केले.