पुणे,दि.२१ : ढोल-ताशांचा पारंपरिक गजर आणि गोविंदा आला रे आला… च्या जयघोषात शिवबा ग्रुप दहीहंडी गोविंदांनी शिवबा ग्रुप आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२२ सुसगांव दहीहंडी ६ थर लावून फोडली. शुक्रवारी रात्री ०९ वाजून १८ मिनीटांनी अवघ्या तिसर्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. मच गया शोर… काठी न घोंगडे… सारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला दहीहंडी उत्सव साजरा केला.
शिवबा ग्रुप सुसगाव कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोठया जल्लोषात यंदा दहीहंडी उत्सव शिवबा चौक 1 up Gym समोर सुसगांव येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती – उपसरपंच सुहास भाऊ भोते, चेअरमन – नामदेव चांदेरे, सरपंच नारायण चांदेरे, जि. प. सदस्य शंकर भाऊ मांडेकर, प्रमुख उपस्थिती – मा. अध्यक्ष मु.ता .भा ज पा – शरद तात्या भोते,आघाडी भाजप पुणे शहर- प्रकाश तात्या बालवडकर, माजी नगरसेवक – बाबुराव आप्पा चांदेरे, उपाध्यक्ष भाजपा पुणे – गणेश कळमकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, ज्योती ताई कळमकर, संस्थापक मातोश्री महिला सामाजिक संस्था -ज्योती चांदेरे.विठ्ठल सुतार. सुखदेव चांदेरे.गुलाब चांदेरे .गोवर्धन बांदल. अमित भोते .विनोद भोते .किशोर चांदेरे .नामदेव झांबरे. निलेश चांदेरे (चेअरमन गणेश सुतार). संजय सुतार . संदीप दादा भोते.दशरथ ससार .तुकाराम चांदेरे.
व मंडळाचे कार्यकर्ते सनी संजय सुतार,वैभव अंकुश भोते, प्रदीप सुतार , संदिप भोते, निलेश गुंड, प्रशांत चांदेरे, दिनेश चांदेरे, महेश चांदेरे,गणेश भोते, किरण चांदेरे, मनीष भोते, संकेत सुतार, तुषार पोतले, महेश काळभोर, पंकज भोते, प्रज्वल भोते, संकेत चांदेरे, अजित भोते,अनुप भोते ,आकाश सुतार .माऊली चांदेरे . तेजस काळे ओंकार चांदेरे . साहिल चांदेरे यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शिवबा ग्रुप सुसगाव येथील दहीहंडी दहिहंडी फोडण्यासाठी संघ
ॐ साईनाथ गोविंदा पथक भांडुप पुर्व दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला सन्मानचिन्ह, ५१ हजार रुपये व गणेशाची प्रतिमा बक्षिस म्हणून देण्यात आली.सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे शिवबा ग्रुपचे अध्यक्ष – सनी संजय सुतार , उपाध्यक्ष* – अजित रवींद्र भोते
यांनी सांगितले.