औरंगाबाद,दि.२१: – एखाद्या ५ महिने गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार होतो तिच्या आई आणि बहिणीवर बलात्कार होतो तिच्या कुटुंबातील 3 वर्षाच्या मुलीसह 7 कुटुंबीयांची हत्या करण्यात आली. अश्या खटल्यातील जन्मठेपेत असलेल्या ११ नराधमांना गुजरात सरकारने चांगल्या वागणुकीच्या आधारावर मोकळे सोडले. हे आम्हाला मान्य नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी आम्ही “युथ फॉर डेमोक्रसी” समूहाकडून आज क्रांती चौक, औरंगाबाद येथे धरणे आंदोलन करण्यात आले. हिंदू धर्म महिलांचे आदर्श आदर सन्मान करणे शिकवतो आणि आणि सध्या सरकार मधले आणि त्यांचे अनुयायी महिलांचा आदर सत्कार करण्याऐवजी सत्कार समारंभ करत कारागृहातुन बाहेर काढत आहे आणि त्यांचा आदर्श सत्कार करत आहे ही गोष्ट निंदनीय आहे आम्ही हिंदू म्हणून त्यांचा निषेध करतो यासाठी आज क्रांती चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.