पुणे,दि.०४:-पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत दिवसा घरफोडी करण्याऱया सराईत अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास करून आरोपींनी चोरून लपविलेले ६० तोळे वजनाचे रूपये ३० लाख किमंतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत केले आहेत. बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीत २०/०६/२०२२ रोजी सायंकाळी ०४:०० वा. ते ०७:०० वा. चे दरम्यान सोबा सवेरा अपार्टमेंट, बिबवेवाडी, पुणे. येथील फिर्यादी यांचे राहते घर कुलूप लाऊन बंद असताना चोरटयाने फिर्यादी यांचे बिल्डींग मधील टेरेसचे लॉक तोडून टेरेस वाटे फिर्यादीचे घराचे गॅलरीला
असलेल्या लोखंडी ग्रील तोडून व वाकवून घरात प्रवेश करून बेडरूम मधील कबर्ड मध्ये असलेले एकूण ६० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम १ लाख चाळीस हजार असे एकूण १८ लाख,७६ हजार,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. गुन्हा दाखल झालेनंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस स्टेशन तपासपथक अधिकारी सपोनि काळुखे व पथक यांनी तपास सुरू करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून फिंगरप्रिंट विभागाची मदत घेवून त्यावरून दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार १) मुश्तफा शकील अन्सारी (रा. ग्रिनपार्क कोंढवा पुणे) याने केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.व बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी प्रविण काळुखे व अमंलदार यांची टिम व गुन्हेशाखा असे समांतर तपास करीत असताना नमुद आरोपीकडील गुन्हयातील दागिने लपवण्यासाठी आरोपी २) जुनेद रिझवान सैफ (वय २९, रा.ग्रीनपार्क सर्व्हे नं.४२, शेरखान चाळ, कोंढवा पुणे), ३) हैदर कल्लु शेख (वय ३१ वर्षे, धंदा- नोकरी
रा.वसवाडी, राजेशिवाजीनगर, पाखर सांगवी, बार्शी रोड, ता. जि. लातूर) यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून कोंढवा व लातूर येथून त्यांना ताब्यात घेतले तसेच आरोपी मुश्ताक शकील अन्सारी यास गुन्हेशाखा युनिट ०१ पुणे शहर यांनी ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे ताब्यात दिले. तिन्ही आरोपींकडे तपासी अधिकारी सपोनि प्रविण काळुखे स्टाफ यांनी सखोल व कौशल्यपुर्ण तपास करून त्यांचेकडून दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले तीस लाख रूपये किंमतीचे ६० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.सदर कारवाई ही अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलिस उप आयुक्त श्रीमती नम्रता पाटील, परिमंडळ ५ पुणे शहर व सहा. पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस अमंलदार संतोष जाधव, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर व राहुल शेलार यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक, प्रविण काळुखे हे करीत आहेत.