पुणे,दि.२५ :- औंध परिसरातील अल्पवयीन मुलींवर विनयभंग पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे औंध परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत औंध गावात राहणाऱ्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका नराधमावर 354 आणि पॉक्सो अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.21) रात्री पावणे आठच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये घडला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच परिसरात राहतात.सोमवारी संध्याकाळी फिर्यादी यांची 10 वर्षाची मुलगी पार्किंगमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती.त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला बोलावून घेतले. तिला तुझ्या पप्पांना फोन करु असे बोलून तिला जवळ बोलावले.फोन करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला.आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत करीत आहेत.