मुंबई, दि.२५ :- बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय हददीतील डोंगरी , मुंबई येथील क्लेअर रोड , भायखळा , मुंबई येथे’ एमडी ‘ ( मेफेड्रॉन ) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परिसरात येणार असल्याची दिनांक २४/०३/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष , आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद दहिफळे यांना गोपनीय माहिती मिळाली व.क्लेअर रोड , भायखळा , मुंबई परीसरात आझाद मैदान युनिटचे पोलीस पथकाने सापळा रचुन इसम नामे आशिक अली फिरोज पोयसरवाला , वय ३३ वर्षे या तस्करला अंमली पदार्थ विरोधी कक्ष , आझाद मैदान युनिट , गुन्हे शाखा , मुंबई यांनी अटक केली आहे . त्याच्याकडील ४ करोड ६६ लाख , ५० हजार रुपये किमतीचा ३ किलो ११० ग्रॅम वजनाचा ‘ एमडी ‘ हा अंमली पदार्था जप्त करण्यात आला आहे ” या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात वाहतुक आणि विक्री करणारा तस्कर आशिक अली फिरोज पोयसरवाला , हा त्याच्याकडील ” एमडी ‘ ( मेफेड्रॉन ) या अंमली पदार्थासह मिळुन आल्याने पथकाने त्यास शिताफीने पकडून त्याच्या ताब्यातून ४ करोड ६६ लाख , ५० हजार रुपये किमतीचा ३ किलो ११० ग्रॅम वजनाचा एम डी हइ अंमली पदार्थ जप्त केले .त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास आज अटक करण्यात आली अटक आरोपी हा ‘ एमडी ‘ ( मेफेड्रॉन ) या अंमली पदार्थाची मोठया प्रमाणात मुंबई व मुंबई उपनगरांमध्ये तस्करी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .तसेच या गुन्हयाचे अनुषंगाने अंमली पदार्थांचे तस्करीत सहभागी असणारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे . गुन्हयातील जप्त अंमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे . अटक आरोपीचे नाव व पत्ता : १ ) आशिकअली फिरोज पोयसरवाला , वय ३३ वर्षे , रा . ठि- नौरोजी हिल रोड , डोंगरी , मुंबई अटक आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळणी केला असता सदर आरोपीवर डोंगरी पोलीस गुन्हा दाखल असून सदर गुन्हयामध्ये तो जामिनावर मुक्त आहे . अशा प्रकारे ‘ अंमली पदार्थमुक्त समाज ‘ बनविण्याचे दृष्टीने बृहन्मुंबई शहर पोलीस आयुक्तालय सतत प्रयत्नशील आहे . सदरची कारवाई पोलीस सह आयुक्त ( गुन्हे ) , मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , विरेश प्रभु , पोलीस उप आयुक्त , दत्ता नलावडे व सहाय्यक पोलीस आयुक्त , सावळाराम आगवणे , अंमली पदार्थ विरोधी कक्ष , मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष , आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. मानसिंग काळे , पो.उ.नि अभिजित पाटील , पो.उ.नि. अमित देवकर , पो.ह. क्र २ ९ ०६१ / मुजावर , पो.ह.क्र ९ ६०३६८ / दोरगे , पो.ना.क्र . ९ ७०७२६ / पाटील , पो . शि . क्र ०८०२३७ / इघे , पो.शि.क्र . ०८०७१२ / भुजबळ , पो . शि . क्र . ० ९ ०२६१ / देशमुख , पो.शि.चा.क्र . ०७१६१० / राठोड पो . शि.चा. क्र . ०७०२०७ / निबांळकर , म.पो.शि.क्र ०८१४५७ / माधुरी राजगुरू , म.पो.शि.क्र ०९१५४२ / आलेकर , गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. मानसिंग काळे हे करीत आहेत .