पुणे,दि.२४ :- पुण्यातील लुल्ला नगर येथील एरिया 37 क्लब येथे सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करुन 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमनलाल सोगमलजी पोरवाल (रा. मार्केटयार्ड, पुणे), सुभाष दिपचंद टेकवानी (रा. भवानी पेठ, पुणे), किशोर मिठालाल जैन (रा. गंगाधाम चौक, पुणे), राकेश अरुण कोंढे यांना तीन पत्त्यांचा जुगार खेळत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर जुगार खेळण्यासाठी हॉल उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेलचा सुपरवायझर सुनिल हेमराज मुंदडा (रा. रविवार पेठ), यतिन दिनेश शहा (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील लुल्ला नगर येथील एरिया 37 क्लब येथे पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एरिया 37 क्लब येथे छापा टकाला. या कारवाईत पोलिसांनी 87 हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य, प्लास्टिक कॉईन्स, 1 लाख 36 हजार 440 रुपयांचे मोबाईल, 23 हजार 440 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 46 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके , पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर याच्यासह सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अमंलदार यांनी केली.