पाषाण टेकडी येथे फिर्यादी व त्यांची मैत्रिण हे फिरायला गेले असताना रात्रौ ०८.१५ वा चे सुमारास ते फिरुन टेकडीवर एके ठिकाणी बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना हाताने व लाथा-बुक्यांनी मारहाण,दमदाटी केली. यानंतर ठार मारण्याची धमकी देवून,त्यांच्या बॅंक खात्यातून फोन-पे च्या माध्यमातून 76 हजार रुपये जबदस्तीने वर्ग करुन घेतले होते.फियादी यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन तात्काळ गुन्हा दाखल करणेत आला .घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस उप – आयुक्त , रोहिदास पवार , परिमंडळ – ४ , पुणे शहर , सहा.पोलीस आयुक्त , रमेश गलांडे , खडकी विभाग , पुणे शहर यांनी घटनास्थळी भेट देवुन , त्यांनी केलेल्या सुचनेनुसार तपास पथकाचे अधिकारी व सर्व स्टाफ यांनी वेग – वेगळया टिम तयार करून , कसोशिने तपास करता , गोपनिय बातमीदारा कडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १ ) गणेश ऊर्फ लहु रामभाऊ चव्हाण , वय – २७ वर्षे धंदा – मिस्तरी , रा.मराठी शाळेजवळ , पवन चक्की जवळ , लोणीकंद , ता . हवेली जिल्हा पुणे , मुळ पत्ता- डोंगर तळा , ता . जिंतुर जिल्हा परभणी २ ) राजु मंजुनाथ जगताप , वय – २५ वर्षे धंदा – मिस्तरी काम , रा . महादेव मंदीराजवळ , नसरापुर ता . हवेली जिल्हा पुणे मुळ गांव- बिरुर , ता . कडोर , जिल्हा चिपमगळुर राज्या कर्नाटक यांनी केल्याचे तपासांत निष्पन्न झाले . त्यावरुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक , राजकुमार वाघचवरे , चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे , पोलीस निरीक्षक , गुन्हे , दादा गायकवाड , सपोनि . संतोष कोळी , तपास पथक अधिकारी , मोहनदास जाधव व तपास पथकातील कर्मचारी यांनी अधिक माहिती गुन्हयातील मुख्य आरोपी १ ) गणेश ऊर्फ लहु रामभाऊ चव्हाण वय – २७ वर्षे धंदा – मिस्तरी , रा.मराठी शाळेजवळ , पवन चक्की जवळ , लोणीकंद ता . हवेली जिल्हा पुणे मुळ पत्ता- डोंगर तळा ता . जिंतुर जिल्हा परभणी . २ ) राजु मंजुनाथ जगताप वय – २५ वर्षे , धंदा- मिस्तरी काम , रा . महादेव मंदीराजवळ , नसरापुर ता . हवेली जिल्हा पुणे मुळ गांव- बिरुर , ता . कडोर , जिल्हा चिपमगळुर , राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेवुन पुढील तपास करता , त्यांचा गुन्हया मध्ये सहभाग निष्पन्न झाला असुन , नमुद आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर पुणे , जालना , नाशिक , पुणे ग्रामिण , अहमदनगर येथील वेगवेगळया पोलीस स्टेशनमध्ये दरोडा , जबरी चोरीचे असे एकुण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत . नमुद आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीत असुन पुढील तपास सुरु आहे . पुणे शहरालगत असणारे टेकडीवर फिरायला जाणारे नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे . सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , नामदेव चव्हाण , पोलीस उप – आयुक्त , परी – ४ , पुणे शहर , रोहिदास पवार , सहायक पोलीस आयुक्त ,रमेश गलांडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक , गुन्हे दादा गायकवाड , सपोनि . संतोष कोळी , तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव , तपास पथकातील पोलीस अंमलदार , सुधाकर माने , प्रकाश आव्हाड , ज्ञानेश्वर मुळे , दिनेश गडाकुंश , तेजस चोपडे मुकूंद तारू , इरफान मोमीन , भाऊराव वारे , बाबा दांगडे , बाबुलाल तांदळे यांनी केली आहे .