गोवा,दि.२२:- ॲसिड ॲटक, कॅन्सर ग्रस्त, आणि तृतीय पंथींयाच्या रोजगारासाठी फोर फॅाक्स कंपनीने पाऊल उचलले असून अभिनेत्री दिपाली सय्यद आणि अभिनेत्री रोशनी कपूर , माहिर करंजकर यांनी पुढाकार घेतला आहे.
या सर्व ग्रस्त लोकांसाठी १६ ते २० मे रोजी गोवा येथे चॅरिटी नोबेल विक चे आयोजन करण्यात आले आहे.
ॲसिड ॲटॅक, कॅन्सर ग्रस्त, तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी चॅरिटी नोबेल विक आणि अपना सुपर स्टोअरची घोषणा …
यावेळी दिपाली सय्यद हिने सांगितले की महिलांना सक्षम होण्याची गरज आहे. लग्न सराईचा खर्च महिलांना सबळ करण्यासाठी वापरला पाहिजे तर रोशनी कपूर हिने सांगितले की महिला जिथे खांद्याला खांदा लावून लढत आहे तिथे त्यांना उत्तम वागणूक मिळाली पाहिजे.
माहिर करंजकर , किशोर नावंडर, बबिता बिश्वास, शिवांकर कडू यांनी सांगितले की प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगताना समाजाचे ऋण फेडण्यासाठी मदत करणे कर्तव्य असल्याचं नमूद केलं .
यावेळी स्वाती ठक्कर, मिताली धूत, ऊर्मिला वर्मा, नेहा बोराडिया, सीमा भानुशाली, दिव्या सोनी, रिद्धी संगराजका यांनी मोलाचा हातभार लावला.
तृतीय पंथीय, कॅन्सर ग्रस्त आणि ॲसिड ॲटॅक अशा व्यक्तींना नव्याने भरारी घेण्यासाठी बळ देण्याचं मोलाचे पाऊल म्हणावे लागेल.