पिंपरी चिंचवड,दि.१९ :- कत्तल केलेल्या गाई, बैल, वासरे यांचे मांस विक्रीसाठी मुंबईला घेऊन जात असताना पुष्पा सिनेमा स्टाईलने गोमांस ची वाहतुक करणारे टोळी महाळुंगे पोलीसांच्या जाळ्यात
. जोपादेवी पेट्रोलपंपाजवळ, खालुंब्रे, ता.खेड येथे शुक्रवारी (दि.18) मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली.महंमद साहिद महंमद हारुण (वय 35, रा. मालेगाव, नाशिक) असे अटक चालकाचे नाव आहे. तर अकलक खान अनिस खान (रा. मालेगाव, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव असून, तो फरार आहे.म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस शिपाई शंकर लालसिंह आडे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्रवारी (दि.18) मध्यरात्री . खालुंब्रे गावचे हद्दीतील एच.पी. चौकामध्ये नेमण्यात आलेल्या नाकाबंदीचे वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग व पोलीस स्टाफ यांनी एका ट्रकला थांबण्याचा इशारा दिला असता , ट्रकवरील चालकाने ट्रक न थांबविता मुंबई बाजुकडे चालवित घेवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केल्याने त्या ट्रकचा पाठलाग करुन काही अंतरावरील जोपादेवी पेट्रोप पंपजवळ ट्रक थांबविला . सदर ट्रक वरील चालकास न थांबता पळुन जाण्याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ट्रकची पाहणी केली असता . ट्रकचे पाठीमागील हौदामध्ये आतिल बाजुस पाण्याचे टँकर प्रमाणे पत्र्याची टाकी बनविण्यात आली होती . त्याची पाहणी करता टाकीमध्ये मांसचे आढळुन आले . ट्रक चालकांकडे चौकशी करता सदर मांस हे गोमांस असल्याचे व त्याचे पाणी ट्रकमधुन खाली पडुन मांस वाहतुकीबाबत पोलीसांना ओळखता येवु नये म्हणुन ट्रकचे पाठीमील हौदामध्ये सदरची टाकी तयार केल्याचे सांगितले . सदर घटनेच्या अनुषंगाने चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अटक आरोपीचे नाव : १ ) महंमद शाहीद महंमद हारुण , वय ३५ वर्ष , रा- एस्ला हॉस्पिटलजवळ , मालेगाव , नाशिक २ ) अकलक खान अनिस खान , वय २२ वर्ष , रा- जुना आझादनगर , मालेगाव , नाशिक आरोपीस तपासकामी दिनांक १८/०३/२०२२ रोजी १८:०० वा . अटक करण्यात आली आहे . आरोपींची दि -२४ / ०३ / २०२२ रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे . आरोपींकडून जप्त माल : १ ) ०६,००,००० / रु किंमतीचे २००० किलो वजनाचे गोमांस . २ ) १०,००,००० / रु किंमतीचा ट्रक नंबर एम एच १२ / के.पी / ०३३३ , जुना वापरता . सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे ,पोलीस उप – आयुक्त मंचक इप्पर , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग , पोउपनि किरण शिंदे , पोलीस अंमलदार राजू राठोड , अमोल बोराटे , तानाजी गाडे , किशोर सांगळे , संतोष काळे , शिवाजी लोखंडे , बाळकृष्ण पाटोळे , शदर खैरे , शंकर आडे , यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शिदे हे करीत आहेत .