पुणे,दि.२८ :- पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा मला काम करण्याची संधी देऊन माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाचे व माझे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, खासदार गिरीशजी बापट, संजयजी काकडे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहरातील भाजपाचे सर्व आमदार, मा. महापौर, सभागृह नेते, सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या सोबत कायम असणारे माझे सहकारी, हितचिंतक आपणा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
भारतीय जनता पार्टीचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज आज दुपारी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष. जगदीशजी मुळीक, महापौर मुरलीआण्णा मोहोळ, उपमहापौर सौ. सुनीता वाडेकर, आमदार सुनीलजी कांबळे, सभागृह नेते गणेशजी बिडकर, राजेश येनपुरे, राजाभाऊ लायगुडे, दीपक पोटे, सुशील मेंगडे, राहुल भंडारी, महेश वाबळे, अमोल बालवडकर, दिलीप वेडेपटील, सौ. मानसीताई देशपांडे, सौ. वर्षा तापकीर, सौ. अर्चना पाटील व इतर सहकारी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे, आरपीआयचे पदाधिकारी व सहकारी मित्रपरिवार यांच्या सोबत भरण्यात आला.