निरा नरसिंहपूर,दि.२८ :-नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे श्री शिव-पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये विज्ञान प्रदर्शन ही घेण्यात आले या प्रदर्शनामध्ये लहान गटा पासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग केले अतिशय कौतुकास्पद प्रयोग पाहून विद्यार्थी ,पालक आणि नागरिक यांच्या डोळ्याचे पारणे फिटले केंद्रप्रमुख सुनीता कदम म्हणाले, की अशा विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते नवीन काही करण्याची ओढ निर्माण होते व भविष्यात असेच होतकरू विद्यार्थी हे शास्त्रज्ञ बनतात.सुनीता कदम मॅडमने सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे तसेच प्राचार्य रविराज काकडे यांचे खूप खूप कौतुक केले.या विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले व आपल्याला आलेले शाळेविषयी अनुभव सांगितले. यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना अक्षरशा गहिवरून आले व त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये परीक्षेविषयी आणि भविष्य काळामध्ये शालेय जीवन विषय काही सूचना दिल्या.विज्ञान प्रदर्शनात प्रसंगी प्रमुख पाहुणे या केंद्रप्रमुख सुनिता कदम मॅडम होत्या.या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून 500 पेक्षा जास्त प्रयोग केले होते यावेळी केंद्रप्रमुख सुनीता कदम, प्राचार्य रविराज काकडे, उपप्राचार्य राजेंद्र मोहिते, इन्चार्ज अतुल हावळे ,महादेव मिसाळ, यशवंत मोहिते, प्रकाश कांबळे, भारत येडे,अविनाश शिंदे,तुषार गोखले, रंजीत कारंडे,भरत साठे,शिपाई विनायक भोसले, सुप्रिया काकडे,सुनंदा काकडे, अनुराधा कोळी, परविन तांबोळी, रूपाली वाघमोडे, सुवर्णा इंगळे, शामल मंडले, अश्विनी गायकवाड, अमृता निंबाळकर, सुप्रिया कांबळे, शितल सूर्यवंशी, करिष्मा कारंडे,पुनम बळवंतराव, मनीषा बळवंतराव आणि शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
निरा प्रतिनिधी :-डाॅ सिद्धार्थ सरवदे