पुणे दि२३:- प्रतिनिधी पुणे पोलिस गुन्हे शाखा युनिट ४ मधील पो. कॉ. शंकर संपत यांना गोपनीय बातमीदारा कडुन खबर मिळाली कि १ इसम भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन तो पुण्यात वेगवेगळ्या भागात चलनात वापर करीत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली होती दि. २१ रोजी पो. कॉ. शंकर संपत यांना आरोपी सोहेल सलिम शेख वय २१ रा. गांधीनगर वस्ती, शिवाजी विद्यालयामागे, देहूरोड, पुणे) गोपनीय बातमीदारा कडुन खबर मिळाली कि हा भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन तो मंगळवार पेठेतील नरपतगीरी चौकात पुणे येथे येणार आहे अशी माहिती युनिट ४ च्या अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली होती व तेथे सापळा रचून त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडे २०० रुपये असलेल्या एकाच नंबरचे ७ नोटा मिळुन आले आहे तर यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांने या सर्व नोटा कलर प्रिंटर व स्कॅनर चा वापर करून त्याची कलर प्रिंट आउट काढून त्यामध्ये दोनशे रुपयेच्या नोटा बनावट नोटा छापून त्या वेगवेगळ्या छोट्या दुकानातदुकान-टपऱ्यांमध्ये वृद्ध महिला गल्ल्यावर बसल्या आहेत. त्यांच्याकडून चॉकलेट-गोळ्या, बिस्कीटे खरेदी करून बनावट नोटा वटवत असे त्याच्याकडून उघडकीस आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा शिरिष देशपांडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा २भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, साहाय्यक पोलिस निरीक्षक आश्विनी जगताप, गणेश पवार सपोर्ट शंकर पाटील कर्मचारी सुनिल पवार शंकर संपते रमेश चौधरी सचिन ढवळे नीलेश चौधरी विषाल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे