पुणे, दि.११: – पुणे सह ईतर ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. पर्यटन स्थळावर देखील नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पुणे पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, भुशी डॅम , घुबड तलाव , लोणावळा डॅम , तुंगाली डॅम , राजमाची पॉइंट , मंकी पॉइंट , अमृतांजन ब्रिज , वलवण डॅम , वेहेरगाव , टायगर पॉइंट , लायन पॉइंट , शिवलिंग पॉइंट , कार्ला लेणी , भाजे लेणी , लोहगड किल्ला , तुंग किल्ला , विसापुर किल्ला , तिकोणा किल्ला , पवना धरण परिसर इत्यादी . लवासा , टेमघर धरण परिसर , मुळशी धरण परिसर , पिंपरी दरी पॉइंट , सहारा सिटी , काळवण परिसर . हवेली घेरा सिंहगड , सिंहगड किल्ला , डोणजे , खडकवासला धरण परिसर आंबेगाव डिंभे धरण , आहुपे पर्यटनस्थळ . जुन्नर शिवनेरी किल्ला , सावंड किल्ला , हडसर किल्ला , आंबे हातवीज , वडज धरण , माणिकडोह धरण , बिबटा निवारा केंद्र , रोहडेश्वर / विचित्र गड , रायरेश्वर किल्ला , भाटघर धरण परिसर , निरादेवघर धरण , आंबवडे , भोर राजवाडा , मल्हारगड तोरणा किल्ला , राजगड किल्ला , पानशेत धरण , वरसगाव धरण परिसर . वेल्हा उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या ऐतिहासिक वास्तु , गड किल्ले व स्मारके , पर्यटनस्थळे , धरणे इत्यादी ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परीसरात पुढील आदेश होईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील . १ ) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील . २ ) वरील प्रतिबंधीत केलेल्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे , मद्य बाळगणे , मद्यवाहतुक करणे , अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे . ३ ) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे . ४ ) वाहनांची ने – आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे , धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे . ५ ) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ , कचरा , काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे . ६ ) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे , टिंगल टवाळी करणे , महिलांशी असभ्य वर्तन करणे , असभ्य हावभाव करणे , शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे . ७ ) सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे , डिजे . सिस्टम वाजविणे , गाडीमधील स्पिकर उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे . ८ ) ज्या कृतीमुळे ध्वनी , वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे . सदरचे आदेश पोलीस , शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी , डॉक्टर्स , अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाहीत . सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील .
मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यात ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरण असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आल्यानंतर covid-19 च्या नियमांचे पालन होणार नाही. परिणामी, परिसरातही covid-19 सह व ओमायक्रोन विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पर्यटन स्थळे असलेल्या या ठिकाणी नागरिकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.