पुणे, दि १७ :-टीईटी परिक्षा घोटाळा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपर घोटाळ्यातील पुणे शहर सायबर पोलिसांनी आरोपींच्या मुस्क्या आवळायला पोलिसांनी सुरूवात केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टीईटी परिक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली.आता पर्यंत या प्रकरणात २ आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून 88 लाख 49980 रूपये रोख 5 ग्रॅम सोन्याचे नाणे 5 तोळ्याचे दागिने व 5 लाख 50 हजार रूपये रुबी एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त जप्त केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणात ४ कोटी 20 लाख रूपये पर्यंत गैरव्यवहार झाल्याचं समजतं
आहेउमेदवारांकडून ३५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत घेतले जात होते. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 88 लाख 49980 रुपये रोख आणि सोनं जप्त केलं आहे. या प्रकरणात आरोपींनी जवळपास साडेचार कोटी रुपयांचे मुद्देमाल जमा केले असल्याचं समजतं आहे. ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाली होती. चार ते पाच जणांची लिंक लागली असून, प्राथमिक तपासातून या गोष्टी समोर आलं असल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.पोलिसांनी जप्त केलेली रक्कम आणि सोनंदोन पेपर फुटी प्रकरणांचा तपास करताना म्हाडा पेपर फुटीची लिंक सापडली. त्यातूनही काही लोकांना अटक केली. त्यात टीईटी च्या परीक्षेत घोटाळा असल्याचं समोर आलं. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तुकाराम सुपे यांना अटक केली. या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली. सदर गुन्हयाचा तपास अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , डॉ . रविंद्र शिसवे सह पोलीस आयुक्त , पुणे शहर ,रामनाथ पोकळे , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) . पुणे शहर ,भाग्यश्री नवटके ,पोलीस उपआयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे , विजय पळसुले , सहाय्यक पोलीस आयुक्त , आर्थिक व सायबर गुन्हे व.पो.नि. डी.एस हाके यांचे मार्गदर्शनाखाली पोनि कुमार घाडगे हे करीत आहेत . या गुन्हयातील तपासाचे कामगिरी मध्ये सायबर पोलीस ठाण्यातील पोनि मिनल पाटील , पोनि अंकुश चिंतामण , पोनि संगिता माळी , पोउनि डफळ , वाघमारे , पडवळ , गवारी , पोलीस अमलदार संदेश कर्णे , नितिन चांदणे , नवनाथ जाधव सचिन वाजे , अनिल पुंडलीक , मानसी मोरे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडील पोनि शिवले , खेडेकर व कोळी यांनी बहुमोल मदत केलेली आहे .