श्रीगोंदा(नगर),दि.०४ :- नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचा श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एल.एल.पी.परभणी (अमडापुर) या ठिकाणी खाजगी कारखान्याने तब्बल ११५ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून ४५ के.पी.एल.डी. इथेनॉल प्रकल्प आणि २०.५ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला आहे. असे वांगदरी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंता भुजंगराव पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
नागवडे कारखान्यातील सहवीज निर्मिती प्रकल्प एकूण ५० टक्के क्षमतेने चालू आहे.तर डिस्लरी प्रकल्प चालू करण्याचे फक्त कारखाना निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन दिले आहे.ते कृतीत केव्हा येईल हे येणारा काळच सांगेल.त्यामुळे खाजगी उद्योगावर नागवडे यांचा भर सहकारात अक्षम्य दुर्लक्ष असा भेदभाव दिसून येत आहे.
परभणी (अमडापुर) येथे नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचा हा खाजगी कारखाना आहे. सन २०१७-२०१८ साली हा खाजगी कारखाना त्रिधार शुगर्स कडून त्यांनी विकत घेतला आणि मागील ४ वर्षापासून उसाचा गळीत हंगाम करत आहे.श्री लक्ष्मी नृसिंह एल.एल.पी.या राजेंद्र नागवडे यांच्या मालकीच्या खाजगी कारखान्याने ११७ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून २८ एकरावर इथेनॉल आणि सहवीज प्रकल्प उभारला आहे. जुलै २०२० मध्ये या प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवानगी घेण्यासाठी अर्ज करून परवाननी मिळवली आहे.८ लाख ४२ हजार ४२५ रुपये उत्पन्न असणारे नागवडे यांनी अगोदर ३५०० मे. टन गाळप करणारा कारखाना विकत घेतला आणि त्यानंतर ११५ कोटी ८४ लाख रुपयाचा इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. नागवडे यांच्या वार्षिक उत्पन्नात हे सर्व विकत घेणे शक्य नाही.हे सर्व खरेदी करायला एवढा प्रचंड पैसा त्यांनी कुठून उपलब्ध केला याचे उत्तर राजेंद्र नागवडे यांनी द्यावे.असे अनंता भुजंगराव पवार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे