पुणे, दि११ :- पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी 5 हजाराची लाच घेणाऱ्या निरीक्षकास पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरूवार) दुपारी रंगेहाथ पकडले आहे.कचरा गोळा करणार्या एकाने तक्रार दिल्यानंतर अॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. मनपाच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी 5 हजाराची लाच घेतली
स्वप्नील कोठावळे असे लाच घेणार्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.
कचरा गोळा करणार्यांना ठराविक ठिकाणी डयुटी देण्याासाठी कोठावळेंनी लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली होती.प्राप्त तक्रारची शहानिशा करण्यात आली. पुण्याच्या अॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला होता.
त्यांनी आरोग्य निरीक्षक स्वप्नील कोठावळेंनी पंचासमक्ष 5 हजार रूपयांची लाच घेतली आहे. आरोग्य निरीक्षकाने लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे , अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा
यांच्या मार्गदर्शनाखाली एससीबीच्या पथकाने केली आहे.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शनकडे तक्रार द्यावी असे आवाहन पुणे अॅन्टी करप्शनकडून करण्यात आले आहे.