पुणे,दि.०६:- बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथील नागरिकांना नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने सूर संध्या या सांगितीक मेजवानीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन बाणेर येथील बंटारा भवन येथे करण्यात आले होते.या सांगितीक कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर सभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पुणे महानगरचे कार्यवाह महेश करपे, पुण्याचे महापौर मुरलीधरजी मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते.यावेळी महापौर मोहोळ म्हणाले, कोरोना काळात संपूर्ण जग झुंजत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे शेकडो कार्यकर्ते, स्वयंसेवक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त या राष्ट्राच्या मदतीसाठी आपले मदतकार्य अविरत चालू ठेवले. या निमित्ताने लहु गजानन बालवाडकर यांनी पुढाकार घेऊन केलेला हा हृदय सत्कार खरंच सर्व स्वयंसेवकांचे मनोधैर्य उंचावणारा आहेयावेळी करपे म्हणाले, कोरोना काळात सर्वसामान्याना मदत करत सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम लहू बालवडकर यांनी
केले. असेच काम नेहमी करत राहो. त्यांनी केलेल्या कामासाठी आम्ही पाठबळ देण्याचे काम नेहमी करत राहू, पुढील वाटचाली साठी त्यांना शुभेच्छा.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय आणि सामाजिक सेवेबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने हृदय सत्कार या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, स्वप्नालीताई सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रभाग क्र. 9 च्या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, अस्मिताताई करंदीकर, उज्वलाताई साबळे, स्वरूपाताई शिर्के, विद्या बालवडकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.यावेळी शारदा सांगवीकर, शरशिवणी सिंग, राजकुमार मर्या, चेतन लोंढे, राजवेंद्र देशपांडे, गिरीधर राठी, सुधीर जोशी, गिरीश कांदळगावकर, गजानन वाटपाळ, प्रशांत पाटील, संतोष खोजगे, कमलेश शिंदे, आमोय देशपांडे, बाबूलाल चौधरी, संदीप खंडळीकर, प्रताप गायकवाड, काळूराम गायकवाड, जोसेफ नाडर, नवनाथ रोटगे, धनंजय कावटे, अनिल घाशी, अशोक आहुजा, संजिवनी शिंग, प्रवण जोशी, सुभाष भोल, सुवर्षा गंधिले, वंदना येरणे, सतीश गुंडावर, मनीष पिंगळे, मंगेश खांडवे, नीलिमा वाघूळदे, स्वरूपा रानडे, ओंकार वळसंगकर, सिद्धेश्वर वागूल, अजिंक्य निंबाळकर, अभिजित करमाळकर, रुही पटवर्धन, सोनिया यनपुरे, जागृती आर्याचीत, विना बेडेकर, कल्याणी संत, मधेय चड्ड आदी उपस्थित होते.