पुणे, दि.३१ :- पुण्याच्या संदिप म्हाशेरेने ३० वर्षावरील गटात २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक जिंकून प्रौढांच्या खेलो मास्टर्स राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक संपादन करून तिहेरी मुकुटाचा मान मिळविला. ही स्पर्धा खेलो मास्टर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व खेलो मास्टर्स गेम्स् असोसिएशन महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित केली आहे.भोसरी येथिल संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथिल अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर सुरू झालेल्या या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत आज (रविवार) महिलांच्या ३० वर्षावरील गटात पालघरच्या नमिता चौधरी यांनी २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ३५.६ सेकंदाची वेळ नोंदवून प्रथम क्रमांकांसह सुवर्णपक जिंकले.गोळा फेक प्रकारात नमिता चौधरी यानी ५.८० मिटर गोळा फेकून कास्यपदक जिंकले. या स्पर्धेतील नमिता चौधरी यांचे हे तिसरे पदक होते. तिसरे पदक आहे. शनिवारी त्यांनी १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.पुरूषांच्या ३० वर्षावरील गटात संदिप म्हाशेरेने आज (रविवारी) २०० मिटर धावण्याच्या शर्यतीत २४.१ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक संपादन केले. या स्पर्धेतील संदिपचे हे तिसरे सुवर्ण होय. संदिपने शनिवार १०० व ४०० मिटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बास्केटबॉलचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वामीनाथन्, बाबू सावरडेकर, खेलो मास्टर्स गेम्स् असोसिएशन महाराष्ट्रचे सरचिटणीस अमन चौधरी, खजिनदार सुनिल हामद, रामदास कुदळे, चंद्रकांत पाटील, शेखर कुदळे यांच्या हस्ते पार पडला.
निकाल पुढिल प्रमाणे :
* पुरूष : ५ हजार मीटर धावणे : ४० वर्षावरील गट : जयपाल भोगर (नागपूर, १७ मि. ११.८ सें.), अरविंद नलावडे (सांगली, १९ मि. ५६.७ सें.), विवेक पाटील (पुणे, २१ मि. ६.३ सें.); ४५ वर्षावरील गट : दिपक ओचानी (पुणे, १८ मि.४९.३ सें.), कालिदास चेलेकर (पुणे, २० मि.८.६ सें.), सुधीर पवार (पुणे, २० मि. ३२.५ सें.); २०० मीटर धावणे – ३० वर्षावरील गट : संदिप म्हाशेरे (पुणे, २४.१ सें.), विशाल शेट्टी (पालघर, २५.५ सें.), नितीन दास (पुणे, २७.० सं.); गोळा फेक : ३० वर्षावरिल गट : निखिल मोरे (पुणे, ११.५३ मी.), प्रतिक खांदेश (पुणे, ८.७१ मी.), अभिजीत गायकवाड (८.०७ मी.). महिला : २०० मीटर धावणे : ३० वर्षावरील गट : नमिता चौधरी (पालघर, ३५.६ सें.), अश्विनी राहते (पालघर, ३८.१ सें.), निलम कारंडे (पुणे, ३८.५ सें.); ८०० मीटर धावणे : मिनल नादत (पालघर, ३ मि.३९.०सें.), प्रिया मिश्रा (ठाणे, ३ मि.४६.१ सें.), दिपाली किरदत (सातारा, ३ मि. ५७.८ सें.); गोळा फेक : ३० वर्षावरील : रूपाली मोरे (पुणे, ६.६३ मि.), निलम करडे (पुणे, ५.९७ मि.), नमिता चौधरी (पालघर, ५.८० मि.); ३५ वर्षावरील गट : प्रिती जोशी (पुणे, ७७.९७ मि.), शितल मराणी (पुणे, ६.१६ मि.), तन्मई कुलकर्णी (पुणे, ५.९९ मि.).
फोटो ओळ :
पुरूषांच्या ३० वर्षावरील गटात २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम रेषा पार करताना पुण्याचा संदिप म्हाशेरे .