पुणे ग्रामीण, दि.३०: – पौड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध गैरकारभार, बेकायदेशीर कृत्ये, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार , जमिनीचे विषय, खोट्या पोलिसांना सहकार्य तसेच पोलिस नसूनही पोलिसांचा पोशाख परिधान करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे अशी तक्रार पोलीस अधीक्षकांडे व्यवसायिक बंडू नथू मारणे (रा.उजवी भुसारी, कोथरुड ) यांनी केली आहे.त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हंटले आहे की पौडचे पोलीस निरीक्षक हे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार , जमिनीचे विषय , खोट्या पोलिसांना सहकार्य करणे अशी कामे करतात. त्यांचा हा कारभार त्यांनी नेमलेले काही पोलिस , काही सर्वसामान्य व्यक्ती व एक व्यक्ती पोलिस नसूनही पोलिसांचा पोशाख परिधान करून करत आहे .त्यांनी तक्रार अर्जात पुढे असे म्हंटले आहे की एक खासगी व्यक्ती स्वतः पोलिस नसतानाही पोलिसांचा पोषाख परिधान करून हप्ते वसूलीची कामे करतो पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या विरुध्द पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी कडक पाऊले उचलून सामान्य जनतेला न्याय द्यावा.