नाशिक,दि.३०:- नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह येथिल बंदीजनांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उदघाटन समारंभ आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी उदघाटन मा.ना.छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते झाले यावेळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षक.प्रमोद वाघ,वरिष्ठ तुरुंगाधिकारी.कारकर शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी कारागृह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कारागृहातील बंदयांनी तयार केलेल्या उत्तम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तू सर्वसामान्य जनतेसाठी विक्रीसाठी उपलब्ध व्हाव्यात व सदर विक्रीतून शासनास महसूल प्राप्त व्हावा या उद्देशाने दिवाळी मेळा ही संकल्पना सन 2012 पासून राबविण्यात येत आहे.कोरोना मुळे यामध्ये खंड पडला होता परंतु यावर्षी परत सुरुवात करण्यात आलेली आहे.कारागृहातील बंदयाना सश्रम कारावासाची शिक्षा लागल्यानंतर कारागृहात असणारे लोहारकाम, सुतारकाम, शिवणकाम, रंगकाम,चर्मकला, कागद कारखाना, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, वाशिंग सेंटर,धोबीकाम,वाहनांचे स्पेअर पार्टस असेंम्बली करणे ईत्यादी पैकी कारखान्यात काम करावे लागते.कारागृहातून मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालयांसाठी फर्निचर, त्यांना लागणारी इतर सामुग्री तसेच पोलीस विभाग, शासकीय वसती गृहे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, आश्रम शाळा,निवडणूक प्रक्रियेसाठी साहित्य, विद्यापीठे ,मा.उच्च न्यायालयात फाईल्स ,फर्निचर इत्यादी सर्व कारागृहात तयार करण्यात येवून पुरवठा केला जातो.यावर्षी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथिल दिवाळी मेळा हा दि:30/10/2021 ते दि:2/11/2021 या कालावधीत असणार आहे.यामध्ये विक्रीसाठी पैठणी,सोफासेट,सागवानी फर्निचर, सागवानी देव्हारा,आराम चेअर,शोभेच्या वस्तू, आकाश कंदील, टॉवेल, चादर,सतरंजी,दरी,चप्पल ,बूट,सँडल, जॅकेट,दिवाळी उटणे,पणती इत्यादी वस्तू उपलब्ध असणार आहेत.