पुणे,दि२४: – पुणे परिसरातील वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर दिवसाढवळ्या लोणी काळभोर येथील उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर गोळीबार झाला होता. त्यामध्ये संतोष जगताप हा मयत झाला असून त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता व लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये २२/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल असून नमूद गुन्हयाचा समांतर तपास पुणे शहर गुन्हे शाखेमार्फत चालू असताना अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर, रामनाथ पोकळे यांना आरोपीचे गोपनीय माहिती मिळाली व
त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ६ चे अधिकारी यांना सदरबाबत माहिती देवून पथक नेमून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशित केल्याने त्यांचे पथकासह सदर ठिकाणी जावुन आरोपी १)पवन गोरख मिसाळ (वय २९, व्यवसाय- खडी सप्लायर, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, हवेली, जि. पुणे), २) महादेव बाळासाहेब आदलिगे (वय-२६, व्यवसाय- शेती. रा जुनी तांबे वस्ती, दत्तवाडी उरळी कांचन, हवेली, जि. पुणे)
यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, पो उपनिरीक्षक सुधीर टेगले, पोलीस अमलदार मच्छिंद्र पाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.