पुणे, दि ०५ :- पुण्यातील वकील पतीबरोबर कारमधून जेवणासाठी जात असलेल्या वकील महिलेसह तिच्या पतीवर कोयत्याने वार करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुण्यातील आंबेगाव बुद्रुक ( येथे घडला.याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तडीपार गुंडासह तिघांना अटक केली आहे.सराईत गुंड रितेश विजय कोंढरे (वय २३, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), ओंकार सुरेश तांबे (वय २८, रा. पदमावती),
निलेश श्रीमंत थोरात (वय २०, रा. पदमावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी अॅड. त्रिवेणी अतुल रुपटक्के (वय २८, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी (गु. र. नं. ६७६/२१) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणी रुपटक्के या आपले पतीसह ३ ऑक्टोंबरला रात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला रितेश कोंढरे याची कार घासून गेली.त्यावेळी अतुल यांनी त्यांची कार कोंढरे यांच्या कारच्या मागे घेतली. पुढे जाऊन ही कार आंबेगाव बुद्रुक येथील जय शिवाजी मित्र मंडळ येथे थांबली.अतुल रुपटक्के यांनी जाब विचारला असता रितेश याने गाडी येवठी घासली म्हणून काय झाले म्हणत तुला माहिती आहे का मी कोण आहे, अशी धमकी देत शिवीगाळ केली.
यावेळी रितेश व त्याच्या दोन साथीदारांनी कारमधून कोयता काढून अतुल यांच्यावर उगारला.त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी या मध्ये पडल्या असताना कोयता त्यांच्या हाताला लागून त्या जखमी झाल्या.
तिघांनी दोघांना लाकडी बॅटने मारहाण करुन तुमची विकेट टाकू अशी धमकी दिली.रितेश कोंढरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर अधिक तपास करीत आहेत.
पोलिस उपायुक्त सागर पाटील , सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण , वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर , पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे , उपनिरीक्षक अंकुश कर्चे (PSI , तपास पथकातील अंमलदार रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा, गुणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर आणि शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक , आशिष कवठेकर करीत आहे